Entrepreneurship Development Program- Marathi - APG Learning
nav-closed

Register for interview

entrepreneurship development program- marathi

Write to us for more information

Entrepreneurship Development Program- Marathi

एपीजी लर्निंगने उद्योजकतेची मूलभूत तत्त्वे शिकविण्यासाठी हा ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ आखला आहे.

 • Please Login..review_star 500
 • student_enrolled 300 Student's Enrolled
 • best_selling Best Selling
Write to us for more information

Course Detail

Format:

Full Time

Duration:

1 Year

Accreditation:

TISS SVE

Course Provider:

APG Learning

Start Date:

01 August 2019

Fees:

₹1,75,000/-

Duration

3 months

Modules

11

Hours

Start Date

Self paced

Course Provider:

APG Learning

1,999.00

Address:Sakal Nagar,

Gate No. 1, Baner Road,

Aundh, Pune 411 007

Training 5 or more people?

Get your team access to APG Learning top 200+ courses anytime, anywhere.

Try APG Learning for Business

About Course

एपीजी लर्निंगने उद्योजकतेची मूलभूत तत्त्वे शिकविण्यासाठी हा 'उद्योजकता विकास कार्यक्रम' आखला आहे. एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे अवघड आहे! आणि जर तुम्हाला माहित नसेल की, याची सुरूवात कोठून करावी, आपला लक्ष्य-गट काय आहे आणि त्यांच्यापर्यंत कसे पोचावे, आपल्या उत्पादन किंवा सेवेची किंमत कशी निश्चित करावी, किंवा आपल्या व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवावे तर हे अधिक आव्हानात्मक होते. उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) आपल्याला या सर्व गोष्टी शिकण्यास मदत करेल. हा एक यशस्वी आणि शाश्वत व्यवसाय / उद्योग (या दोघांपैकी एक शब्द वापरावा) बांधणी आणि स्केलिंगची / मोजमामाची / प्रमाणाची (या तिघांपैकी एक शब्द वापरावा) प्रक्रिया समजून घेण्यास मदत करण्यासाठीचा स्टेप-बाय-स्टेप दृष्टिकोन विकसित करणारा अभ्यासक्रम आहे. यशस्वीरित्या व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक मूलभूत कौशल्ये विकसित करण्यात हा अभ्यासक्रम मदत करतो. कृपया लक्षात घ्या की ईडीपी आपल्याला यश मिळवून देण्याची खात्री देत नाही, किंवा तुमच्या व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी जादूची कांडी देत नाही, परंतु हा अभ्यासक्रम तुम्हाला चुका टाळायला शिकवेल जे इतर लोकांना अवघड पद्धतीने (म्हणजे चुका करून) शिकायला मिळाले.  

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मनातील कल्पना मांडण्याची संधी मिळेल आणि निवडलेल्या कल्पनांना गुंतवणूकदारांच्या समोर सादर करण्याचीही संधी मिळेल *

 

Modules

 

मॉड्यूल १ उद्योजक आणि उद्योजकता
मॉड्यूल २ उद्योजक होण्यासाठीच्या आवश्यक
मॉड्यूल ३ उद्योजकतेची संकल्पना आणि ओळख
मॉड्यूल ४ निधी उभारणे
मॉड्यूल ५ टीम तयार करणे
मॉड्यूल ६ बाजाराचा अभ्यास/संशोधन
मॉड्यूल ७ नोंदणी आणि कायदेशीर प्रक्रिया
मॉड्यूल ८ अप फायनान्स / व्यवसाय सुरु करण्यासाठीचा निधी
मॉड्यूल ९ बजेटिंग, अंदाजपत्रक आणि व्यवसायाची योजना
मॉड्यूल १० आवश्यक अशी विक्री आणि विपणन व्यवस्था
मॉड्यूल ११ अभ्यासक्रमाचे वितरण

 

अभ्यासक्रमाचे वितरण

 • अभ्यासक्रमाची रचना स्वयं प्रगती आधारीत असून तो मॉड्यूलनुसार शिकवला जाईल.
 • प्रत्येक आठवड्याला 1 मॉड्यूल वितरित केले जाईल. / शिकवले जाईल.
 • प्रत्येक मॉड्यूलनंतर 1 आठवड्याचा वेळ दिला जाईल जेणेकरून लोकांना मॉड्यूल समजण्यास पुरेसा वेळ मिळेल आणि  जे काही शिकवले गेले आहे ते प्रत्यक्षात लागू करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्नही होईल.

Learning Outcomes

 • व्यवसाय सुरू करण्याची पूर्वतयारी
 • एखादि कल्पना कशी ओळखावी, त्याची संकल्पना आणि बांधणी कशी करावी
 • कल्पनेचे व्यवसायात रुपांतर करा
 • एखाद्या व्यवसायाची योजना तयार कशी करावी
 • प्रतिस्पर्ध्यांचे, बाजारपेठेचे आणि मागणीचे विश्लेषण करा
 • विक्री आणि विपणन व्यवस्थेची मूलतत्त्वे
 • कर्ज घेण्याची मूलभूत माहिती / कर्ज घेण्याची मूलतत्त्वे
 • सहकाऱ्यांची संघ / टीम म्हणून बांधणी कशी करावी आणि व्यवसायाचा विस्तार कसा करावा?
 • आपल्या व्यवसायाचा आकार वाढवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी काय करावे
 • व्यवसाय वाढवण्यापूर्वी त्याची छोट्या स्वरूपात बांधणी करा.

Who Should Attend

कोणतीही व्यक्ती जी उद्योग / व्यवसाय प्रारंभ करण्यास उत्सुक आहे ती या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकते. अभ्यासक्रमाचे मोड्यूल्स परिपूर्ण आणि सखोल आहेत आम्ही ते अशा प्रकारे तयार केले आहे की मूलभूत संकल्पना आणि विषय सर्वत्र समानच राहतील.

खालील व्यक्तींनी निश्चितपणे या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायला हवा.

 • लघु उद्योगांचे मालक
 • ग्रामीण उद्योजक
 • महत्त्वाकांक्षी / नवीन काहीतरी करण्याची इच्छा बाळगणारे उद्योजक
 • व्यवसायाची पार्श्वभूमी असणारे लोक
 • अभियंते
 • शेतकरी

Certificate

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तुम्हाला एपीजी लर्निंगतर्फे प्रमाणपत्र मिळेल.

nav-closed

Download Brochure